प्रतिनिधी/ रत्नागिरी
जिह्यामध्ये एसटीचा संप सुरू असतानाही प्रवासी संख्येत मोठी वाढ दिसून येत आह़े तसेच जिल्हाभरातून फेऱयांची संख्याही वाढली आह़े गुरुवारी जिह्यात तब्बल 18 हजार 336 प्रवाशांची नोंद झाल़ी विशेषतः ग्रामीण भागातून एसटीला चांगला प्रतिसाद मिळत आह़े सर्वाधिक प्रवासी संख्या 4977 ही देवरूख आगारातून झाल्याची माहिती एसटी प्रशासनाकडून देण्यात आली.
जिह्यात आता एकूण 600 हून अधिक कर्मचारी कामावर हजर झाले आहेत़ दरम्यान, एसटीचे शासनामध्ये विलीनीकरण करावे यासाठी संप सुरू असतानाच जिह्यात शुक्रवारी 300 हून अधिक फेऱया सुरू करण्यात प्रशासनाला यश आल़े राज्यभर कर्मचारी संपावर ठाम असताना रत्नागिरीत कर्मचारी कामावर हजर राहत आहेत़ असे असले तरी चालक-वाहक कामावर हजर रहावेत यासाठी एसटीच्या अधिकाऱयांकडून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत़ शुक्रवारीही एसटीच्या कर्मचारी संघटनांशी चर्चा करण्यात आल़ी मात्र कर्मचारी संपाच्या भूमिकेवर ठाम होते.
रत्नागिरी विभागातील 23 डिसेंबरची प्रवासी संख्या
आगार प्रवासी संख्या
मंडणगड 197
दापोली 4710
खेड 2235
चिपळूण 2851
गुहागर 60
देवरूख 4977
रत्नागिरी 0
लांजा 437
राजापूर 2869
एकूण 18336