प्रतिनिधी/ रत्नागिरी
जिह्यामध्ये कोरोनामुळे आणखी 12 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आह़े सोमवारी नव्याने केवळ 69 कोरोनाबाधित आढळून आले आहेत़ रूग्णांच्या संख्येत घट होत असले तरी मृत्यूंच्या संख्येत वाढत होत आह़े चाचण्यांची संख्या मात्र मागील काही दिवसांपासून सातत्याने कमी होत असून याबाबत जिल्हा प्रशासनाकडून कोणताही खुलासा करण्यात आलेला नाह़ी
जिल्हा शासकीय रूग्णालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी जिह्यात एकूण 3 हजार 324 कोरोना चाचण्या करण्यात आल्य़ा यामध्ये आरटीपीसीआर चाचणीत 2 हजार 218 पैकी 43 तर ऍन्टीजेन चाचणीत 1 हजार 106 पैकी 26 जणांचे अहवाल कोरोनाबाधित आढळून आल़े यामध्ये दापोली 15, खेड 4, गुहागर 3, चिपळूण 11, संगमेश्वर 4, रत्नागिरी 32, असे तालुकानिहाय नवे रूग्ण आहेत़ यामुळे जिह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 75 हजार 752 झाली आह़े आरटीपीसीआरचाचण्यांनुसार जिह्याचा पॉ†िझटिव्हीटी रेट 1.93 टक्के आह़े
जिह्यामध्ये शनिवारी एकूण 12 मृत्यूची नोंद करण्यात आल़ी मृतांमध्ये खेड तालुक्यातील 3, चिपळूण व रत्नागिरीत प्रत्येकी 2, मंडणगड, दापोली, गुहागर, संगमेश्वर व राजापूरात प्रत्येकी 1 अशी 12 मृत्यूंची नोंद झाली आह़े यामुळे मृतांची एकूण संख्या 2 हजार 314 व मृत्यूदर 3.05 झाला आह़े बरे झालेल्या 106 जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आल़े असून बरे झालेल्यांची एकूण संख्या 72 हजार 313 झाली आह़े बरे होण्याचे प्रमाण 95.47 आह़े सद्यस्थितीत 1 हजार 24 रूग्ण उपचारात दाखल असून यामध्ये केवळ 266 रूग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसून येत आहेत़