उपहारगृहाची जुनी इमारत जमीनदोस्त : अस्ताव्यस्त पार्किंगची समस्या सुटणार
प्रतिनिधी /बेळगाव
येथील जिल्हा पंचायत कार्यालयाच्या आवारातील जुने उपहारगृह जमीनदोस्त करण्यात आले आहे. त्याठिकाणी आता नव्या उपहारगृहासह सुसज्ज वाहनतळ उभारण्यात येणार आहे. त्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून यामुळे जि. पं. आवारातील अस्ताव्यस्त पार्किंगची समस्या सुटणार असल्याचे अधिकाऱयांनी सांगितले.
जि. पं. कार्यालयाचे नव्या इमारतीत स्थलांतर झाल्यानंतर वाहनतळाची समस्या तीव्र बनली. अधिकारी-कर्मचारी यांच्यासह कार्यालयीन भेटीसाठी येणारे नागरिक वाहने अस्ताव्यस्त लावतात. परिणामी अनेकवेळा वरि÷ अधिकाऱयांची वाहने कुठे लावायची? हा चालकांसमोर प्रश्न असतो. मोर्चे व आंदोलनावेळी तर मोठी पंचाईत होत असते. मात्र, आता ही समस्या सुटणार आहे.
कार्यालय आवारातील जुने उपहारगृह जमीनदोस्त करण्यात आले असून त्या ठिकाणापासून कार्यालयाच्या दर्शनी भागापर्यंत अखंड इमारत बांधली जात आहे. तळघरात वाहनतळ, वरच्या मजल्यावर कार्यालये आणि उपहारगृह अशी ही योजना आहे. त्यासाठी पंचायत राज आणि ग्रामीण विकास खात्याने 2 कोटी 50 लाखांचा निधी मंजूर केला आहे. सध्या या सुसज्ज वाहनतळाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. सदर वाहनतळात अधिकाऱयांची चारचाकी वाहने, कर्मचाऱयांच्या दुचाकी तसेच कार्यालयीन कामकाजासाठी येणाऱयांच्या वाहनांना मुभा असेल. कार्यालयासमोर मात्र वाहने लावणे बंद केले जाणार असल्याचे अधिकाऱयांनी सांगितले.
लिफ्टचीही सोय
सध्या जि. पं. कार्यालयात विविध विकासकामे हाती घेण्यात आली आहेत. दुमजली कार्यालयात यापूर्वी केवळ जिन्याची सोय होती. पण आता लिफ्टचीही सोय केली जात असून हे काम हाती घेण्यात आले आहे. आगामी काळात कार्यालयाचे मजले वाढवून काही महत्त्वाच्या खात्यांची कार्यालये येथे स्थलांतरित केली जाण्याची शक्मयता आहे.