रयत नेत्यांची मागणी : आमदार महादेवप्पा यादवाड यांना निवेदन
वार्ताहर/ रामदुर्ग
केंद्र शासनाने मका पिकाला निर्धारित केलेल्या क्विंटलला 1850 हमीभाव (एमएसपी) ने तालुक्मयातील प्रत्येक जि. पं. क्षेत्रामध्ये खरेदी केंद्र सुरू करण्याचा आग्रह करीत रयत नेत्यांनी आज रविवारी आमदारांना निवेदन दिले.
तालुक्यात नदीकाठावर असणाऱया गावांना मलप्रभा नदी च्या महापुराने अतोनात नुकसान झाले असून थोडय़ा प्रमाणात मका पीक हाती आल्याने त्या आशेवर शेतकरी असताना बाजारामध्ये क्विंटलला 1200 ते 1300 रुपये दर असून यामुळे शेतकऱयांना नुकसान होत असून लागलीच केंद्र शासनाच्या हमीभावाप्रमाणे खरेदी केंद्र सुरू करून संकटात असणाऱया शेतकऱयांना पद्धतीचा हात देण्यास पुढे व्हावे, असा निवेदनाद्वारे आग्रह केला.
आमदार महादेवप्पा यादवाड यांनी निवेदनाचा स्वीकार करीत म्हणाले, की जिल्हाधिकाऱयांशी चर्चा करीत हमीभावाने खरेदी केंद्र सुरू करण्याचा भरवसा दिला. एपीएमसी अध्यक्ष द्यावप्पा बेळवडी, उपाध्यक्ष प्रकाश बरदेली, रयत नेते रामनगौडा पाटील, एस. डी. कुलकर्णी, मोदीन्न वंटी, बसवराज करीगार, संगय्या हिरेमठ, एम. एस. मेटी, हणमंत मडीवाळर आदी रयत नेते उपस्थित होते.