प्रतिनिधी/ निपाणी
मे महिन्यात राज्यातील बहुतांशी जिल्हा पंचायत व तालुका पंचायतींची मुदत संपत आहे. अशावेळी सदर निवडणुका घेण्यासाठी निवडणूक आयोगाने आवश्यक तयारी सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून जि. पं व ता. पं. जागांच्या आरक्षणाचा कोटा जाहीर करण्यात आला आहे. निवडणूक आयोगाचे प्रधान सचिव नागराजू एन. आर. यांनी यासंदर्भातील अधिसूचना जारी केली आहे.
त्यानुसार, बेळगाव जिल्हा पंचायतीसाठी एकूण 101 जागा असणार असून त्यापैकी 51 जागा महिलांसाठी राखीव असणार आहेत. यामध्ये अनुसूचित जातीसाठी 12 (6 महिलांसाठी राखीव), अनुसूचित जमातीसाठी 7 (महिला 4), ओबीसी अ प्रवर्गासाठी 25 (महिला 13), ओबीसी ब प्रवर्गासाठी 6 (3 महिला) तर उर्वरित 51 जागा सामान्य प्रवर्गासाठी खुल्या राहणार आहेत. त्यापैकी 25 जागांवर महिला उमेदवार निवडल्या जाणार आहेत. त्याचप्रमाणे तालुका पंचायतीच्या आरक्षणाचा कोटाही जाहीर करण्यात आला आहे. यामध्येही महिलांसाठी 50 टक्के जागा राखीव असणार आहेत.
निपाणी तालुका पंचायतीच्या 16 पैकी 8 जागा महिलांसाठी राखीव असणार आहेत. त्यामध्ये अनुसूचित जातीसाठी 3 (पैकी 2 महिला) अनुसूचित जमातीची एकमेव जागा महिलेसाठी, ओबीसी अ प्रवर्गासाठी 3 (2 महिला), ओबीसी ब प्रवर्गासाठी एक तर 8 जागा सामान्य प्रवर्गासाठी असून त्यापैकी 3 महिलांसाठी राखीव असणार आहेत. चिकोडी तालुक्मयातील एकूण 21 जागांपैकी 11 जागांवर महिलाराज असणार आहे. यामध्ये अनुसूचित जातीसाठी 3 ( पैकी 2 महिला), अनुसूचित जमातीची एक जागा महिलेसाठी राखीव, ओबीसी अ प्रवर्गासाठी 5 (2 महिला ) ओबीसी ब महिलेसाठी 1 व 11 जागा सामान्य वर्गासाठी असून त्यापैकी 5 महिलांसाठी राखीव असणार आहेत.
हुक्केरी तालुक्मयात एकूण 28 पैकी 14 जागा महिलांसाठी राखीव असणार आहेत. यामध्ये अनुसूचित जातीसाठी 4 (पैकी 2 महिला), अनुसूचित जमातीसाठी 4 (2 महिला) ओबीसी अ प्रवर्गासाठी 5 ( 2 महिला ), ओबीसी ब प्रवर्गातील महिलेसाठी एक जागा तर सामान्य वर्गासाठी असलेल्या 14 जागांपैकी 7 जागा महिलांसाठी राखीव असणार आहेत. आरक्षणाचा कोटा जाहीर झाल्यामुळे लवकरच मतदारसंघनिहाय आरक्षण जाहीर होण्याची शक्मयता आहे. दोन महिन्यापूर्वी नव्याने जिल्हा व तालुका पंचायत मतदारसंघाची पुनर्रचना करण्यात आली आहे.