प्रतिनिधी/ गगनबावडा
गगनबावडा तालुक्यात कोविड लसिकरणाचा शुभारंभ येथील ग्रामिण रुग्णालयात जि.प.अध्यक्ष बजरंग पाटील यांच्या हस्ते नुकताच करण्यात आला.जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अनिल माळी, तहसिलदार संगमेश कोडे , गटविकास अधिकारी शरद भोसले,पंचायत समिती सभापती सौ संगिता पाटील, उपसभापती पांडुरंग भोसले,अधिक्षक डाॅ.एस.बी.थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.गारीवडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डाॅ.अजय गवळी यांना डाॅ.फारुख देसाई यांच्याहस्ते पहिली कोविड लस देण्यात आली.
गगनबावडा तालुक्यातील आरोग्य कर्मचारी,अंगणवाडी सेविका, मदतनिस,आशा सेविका,महसूल व पंचायत समिती कर्मचारी,इत्यादींचा समावेश असलेल्या २८१ जणांना ही लस देण्यात येणार आहे.दि.४ रोजी १०० दि.५ रोजी १०० जणांना ही लस देण्यात येणार आहे.उर्वरित लोकांना टप्याटप्याने ही लस देण्यात येणार आहे.यावेळी घेणाऱ्यांना २८ दिवसांनंतर पुढील डोस देण्यात येणार असल्याची माहिती तालुका वैद्यकिय अधिकारी डाॅ.विशाल चोकाककर यांनी दिली.
यावेळी माजी सभापती सौ.मंगल कांबळे, सदस्य आनंदा पाटील,संजय कांबळे,सुहास घाटगे ,डाॅ.पंकज दाते,डाॅ.विशाल पाटील,डाॅ रुपाली चिंचणेकर,शबाना मुजावर,पूजा भोई,अर्जून इंगळे,विजय सावंत,आनंदा काळे,अंकूश तेलंगण,सुनिल ठोंबरे,नियाज शेख ,आय.व्ही.पूजारी ,दूधवाडकर इत्यादी उपस्थित होते.