आयुक्तांचे आदेश : अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱयांची नियुक्ती
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
लाड पागे प्रकरणात समाविष्ट असणाऱया कर्मचाऱयांनाच पदोन्नती दिल्याने मनसेचे कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी विभागीय आयुक्तांकडे तक्रार केल्यानंतर जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी पदोन्नतीची चौकशी सुरू केली आहे. त्यासाठी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस यांची चौकशी अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
लाड पागे प्रकरणात सफाई कामगारांच्या वारसांना चुकीच्या पद्धतीने नियुक्त्या दिल्या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून याच प्रकरणात समाविष्ट असणाऱया कर्मचाऱयांना घाईगडबडीने पदोन्नत्या देण्यात आल्याची तक्रार होती. याबाबत तक्रारी करूनही दखल घेतली नव्हती. अखेर कोकण आयुक्तांकडे तक्रार केल्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दखल घ्यावी लागली.
जिल्हा परिषदेतील कर्मचाऱयांनी देखील सेवा ज्ये÷ता डावलून पदोन्नतीत अन्याय झाल्याने मुख्य कार्यकरी अधिकाऱयांकडे दाद मागितली होती. त्यावेळी 27 नोव्हेंबर 2020 रोजी काढलेले आदेश नियमबाह्य व मार्गदशक सूचना डावलून प्रभारी अधिकाऱयांनी काढल्याने मनसेने तक्रार दाखल केली होती. पदोन्नती बिंदूनामावली पडताळणी न करणे, अपंग आरक्षण डावलने, असे मनसेचे आक्षेप होते. तर कर्मचाऱयांकडून सेवा ज्ये÷ता यादी डावलून मर्जीतल्या लोकांना पदोन्नती देणे असे आक्षेप होते. याबाबत आयुक्तांनी दखल घेत सखोल चौकशी करून कारवाईसह अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत. त्याप्रमाणे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी पदोन्नतीची सखोल चौकशी होण्यासाठी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस यांच्याकडे चौकशी सोपविली आहे.