गोडोली / प्रतिनिधी :
जिल्हा परिषद सदस्यांना पिवळे, पंचायतचे सदस्यांना पांढरे आणि सरपंचांना आकाशी निळा रंगाचे ओळखपत्र देण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेकडून हि ओळखपत्रे दिली जाणार असून, याबाबत उपसचिव डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी यांनी आदेश दिले आहेत.
कामानिमित्त बाहेर पडल्यावर ओळख निर्माण व्हावी, यासाठी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य आणि सरपंचांनी ओळखपत्र मिळावे, अशी मागणी केली होती. आता ती जिल्हा परिषदेच्या खर्चातून देण्यात येणार आहेत.
जिल्हा परिषदेच्या खर्चातून हि ओळखपत्रे दिली जाणार असून, त्यावर जिल्हा परिषदेचा लोगो असणार आहे.
जि.प.आणि प.स. सदस्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी तर सरपंचांना गटविकास अधिकारी यांच्या मार्फत ती दिली जातील. कार्यकाल संपल्यानंतर ती ओळखपत्रे जमा करून घेतली जाणार आहेत.