बांदा/प्रतिनिधी-
जिल्हा परिषद सदस्या श्वेता कोरगावकर यांनी आपली मुलगी श्रेया कोरगावकर हिच्या वाढदिवसानिमित्त 1 फॉलॉवर बेड डॉक्टर संदीप फाउंडेशन ला देणगी स्वरुपात दिला. त्याचप्रमाणे श्री प्रमोदजी कामत यांच्या वाढदिवसानिमित्त प्रमोदजी कामत मित्रमंडळाने 1 फॉलॉवर बेड फाउंडेशन साठी देणगी स्वरुपात दिला. यावेळी डॉ.संदीप फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.दिलीप सावंत डॉ. प्रसाद कोकाटे, सावंतवाडी भारतीय जनता पार्टीचे मंडल अध्यक्ष महेश धुरी,डिंगणे उपसरपंच जयेश सावंत त्याचप्रमाणे विनेश सावंत सूनील धामापुरकर मनोज कल्याणकर श्वेता कोरगावकर व श्री प्रमोद जी कामत उपस्थित होते. श्री प्रमोदजी कामत व जि. प.सदस्या सौ.स्वेता कोरगावकर यांनी यापुढेही अशाच प्रकारची मदत फाउंडेशन साठी आपल्या कडून राहील असे सांगितले व फाउंडेशनने यापुढेही गरीब गरजूंसाठी अशाच प्रकारची सेवा द्यावी असे सुचविले.