बेळगाव : केएलएस संस्थेच्या जीआयटी आर्किटेक्चरच्या विद्यार्थ्यांनी ‘नासा’ म्हणजेच नॅशनल असोसिएशन ऑफ स्टुडंट्स ऑफ आर्किटेक्चर आयोजित स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून लूईस खान ट्रॉफी पटकावली.
दरवषी नासा विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा आयोजित करते. भारताची समृद्ध परंपरा, ऐतिहासिक स्मारके याबाबत जागृती करणे, हा या स्पर्धेचा हेतू आहे. यंदा ‘रुडीमेंट्स-व्हर्नाक्मयुलर ट्रडिशन्स-कंटेम्प्ररी आर्किटेक्चर’ ही स्पर्धेची थीम होती. एकूण साठ संस्थांनी स्पर्धेत भाग घेतला होता.
जीआयटीच्या विद्यार्थ्यांनी ‘खमीर आर्ट ऍण्ड क्राफ्ट रिसोर्स सेंटर’ या कच्छ-गुजरातमधील स्थळाची माहिती सादर केली व प्रथम क्रमांक मिळविला. विद्यार्थ्यांना प्रा. ए. व्ही. प्रसादी व प्रा. बी. व्ही. गौरीपूर यांचे मार्गदर्शन लाभले. चेअरमन एम. आर. कुलकर्णी, प्राचार्य जयंत कित्तूर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.