बेळगाव / प्रतिनिधी
जीआयटी कॉलेजच्या एमबीए विभागाच्या विद्यार्थ्यांनी डिजीटल मार्केटिंग विषयात सलग 40 तास गुगल डिजीटल ऍनालॉक सटीफिकेशन पूर्ण केले. गुगलच्यावतीने सहभागी 56 विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.
200 हून अधिक विद्यार्थ्यांनी नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचा प्रोग्रॅम पूर्ण केला. एमबीए विभागाचे प्रमुख डॉ. दास यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करीत या प्रोग्रॅमचा विद्यार्थ्यांना फायदा होईल. कॉलेजने अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांशी समन्वय करार केला असल्याने त्याचाही फायदा विद्यार्थ्यांना होणार असल्याचे असे त्यांनी सांगितले. प्राचार्य डॉ. जयंत कित्तूर यांनी विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य निर्माण करण्यासाठी याचा उपयोग होईल, असे सांगितले.