प्रतिनिधी /बेळगाव
केएलएस गोगटे इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या एमबीए, एमसीए, एमटेक 2021-22 या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश घेतलेल्या पोस्ट ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ नुकताच झाला. उद्योजक कीथ मचाडो, बेंगळूर येथील आरएसए सिक्मयुरिटीजचे विवेक हेब्बाळकर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
कीथ मचाडो म्हणाले आजच्या बदलत्या जगात आपण अनेक गोष्टींमुळे विचलित होवू शकतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी लक्ष विचलीत होवू न देता बुद्धिमत्ता व ज्ञान वाढवावे असे त्यांनी सांगितले. विवेक हेब्बाळकर यांनी कॉलेजमध्ये आयोजित कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घ्यावा त्यामुळे संभाषण कौशल्य सुधारण्यास मदत होईल.
प्राचार्य जे. के. कित्तूर यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले. विभागप्रमुख डॉ. एम. एस. पाटील यांनी विद्यार्थ्यांनी पदवी शिक्षण पूर्ण केल्याबद्दल त्यांचे कौतुक केले. तसेच अभ्यासक्रमाची माहिती दिली. एम. बी. ए. विभाग प्रमुख डॉ. के. एस. एल. दास म्हणाले, केएलएस जीआयटी गेल्या चार दशकांपासून विद्यार्थ्यांच्या विकासासाठी प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी सांगितले. श्वेता जानगेकर यांनी सूत्रसंचालन केले. श्रीज धनी यांनी स्वागतगीत सादर केले.