प्रतिनिधी /बेळगाव
जीआयटीच्या एमबीए विभागाच्या विद्यार्थ्यांनी नुकत्याच झालेल्या डब्ल्यूआयई काँग्रेस 2022 हॅकेथॉनमध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविला. सदर कार्यक्रम आयईईईच्या उत्तर कर्नाटक विभागाने आयोजित केला होता. स्पर्धेसाठी ‘डायव्हर्सिटी ऍण्ड इनक्मयुजन’ हा विषय देण्यात आला होता.
यामध्ये इशिका शहा, अनुष्का बस्तवाडकर, श्रुती देशपांडे, कृष्णाजी सुगटे यांनी प्रथम क्रमांक, महम्मद अजरुद्दीन शेख, शिवानी गायकवाड, आलिशा बहाद्दूरअल्ली, अनंत एस. यांनी द्वितीय तर अभिराज गावडे, आदर्श पाटील, श्रेया महेंद्रकर, सुकन्या होसमनी यांनी तृतीय क्रमांक पटकाविला. प्राचार्य जयंत कित्तूर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. या स्पर्धेसाठी डॉ. वाणीश्री हुंडेकर, प्रा. मुपूर वेसणे, प्रा. संजीवनी गुर्जर व डॉ. अमित चाटे यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले. या यशाबद्दल डीन डॉ. के. एस. एल. दास, कार्यकारी मंडळाचे चेअरमन प्रमोद काटवी व प्राचार्य जयंत कित्तूर यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.