युजीसी समिती सदस्यांकडून कॉलेजची पाहणी
प्रतिनिधी /बेळगाव
एसकेई सोसायटी संचालित जीएसएस कॉलेजचा परिसर अतिशय स्वच्छ आणि हिरवाईमुळे रम्य आहे. येथील सर्व विभागांना आम्ही भेट दिली असून या विभागांचे काम समाधानकारक आहे. ग्रंथालय सर्व सोयींनी सुसज्ज असून पुस्तकांची मांडणी अत्यंत शिस्तबद्ध आहे. विद्यार्थ्यांनी या सर्वांचा उपयोग करून आपल्या ज्ञानात भर घालावी, अशी अपेक्षा युजीसी म्हणजे विद्यापीठ अनुदान आयोग समितीच्या सदस्यांनी व्यक्त केली.
एसकेई सोसायटीने जीएसएस कॉलेजला स्वायत्त दर्जा मिळावा यासाठी युजीसीकडे अर्ज केला होता. या अर्जाची दखल घेऊन युजीसी समितीच्या सदस्यांनी कॉलेजला भेट देऊन पाहणी केली. त्यांनी विद्यार्थी आणि प्राध्यापकांबरोबर संवाद साधला. त्यावेळी त्यांनी ही अपेक्षा व्यक्त केली.
या समितीमध्ये डॉ. भरत सिंग, प्रा. रिषी भरत्रीहरी मत्स विद्यालय, कोटा, प्रा. हॅरेल थॉमस, डॉ. एच.एस. गोर, विश्वविद्यालय, सागर, डॉ. पडीयाराजन, एनजेए कॉलेज शिवकाशी, राणी चन्नम्मा विद्यापीठाचे प्रा. शिवानंद गोरनाळे, कॉलेजीएट एज्युकेशन जे.टी.चे संचालक हनुमंतय्या व युजीसी सेक्टर ऑफीसर अजय जोशी यांचा सहभाग होता.
या समितीच्या सदस्यांनी कॉलेजच्या सर्व विभागांना भेट दिली. विभागप्रमुख प्राचार्य बी. एल. मजुकर (बॉटनी), प्रा. सुचेता कुलकर्णी (फिजिक्स), प्रा. संदीप देशपांडे (केमिस्ट्री), प्रा. प्रमोद हणमगोंड (जिओलॉजी), प्रा. अरविंद हलगेकर (झुऑलॉजी), प्रा. नागसुरेश
(मॅथेमॅटिक्स), प्रा. अनुजा नाईक (भाषा), नमिता सामंत (ग्रंथालय), प्रा. शर्वरी देसाई (कॉम्प्युटर सायन्स) यांनी आपल्या विभागांची त्यांना माहिती दिली.
सदस्यांनी कॉलेजच्या बोटॅनिकल गार्डनला भेट दिली व झाडांना क्मयुऑर कोड देण्याच्या संकल्पनेचे कौतुक केले. तसेच जिओलॉजीच्या संग्रहालयाची प्रशंसा केली. सदस्यांनी प्राध्यापकांबरोबरच कर्मचारी आणि विद्यार्थी यांच्याशीही संवाद साधला. येथील परिसर ‘ग्रीन ऍन्ड क्लीन’ आहे, त्याचा तुम्ही उपयोग करून घ्या, ग्रंथालयाचा वापर करून आपल्या ज्ञानात भर घाला. तसेच प्रशासकीय परीक्षा देण्यासाठी तयारी करा, असे सांगितले.
सोसायटीचे चेअरमन किरण ठाकुर यांनी समिती सदस्यांचा सत्कार केला. या भेटीच्या निमित्ताने ऑर्केस्ट्रॉ, कथ्थक नृत्य, भरतनाटय़म् असे सांस्कृतिक कार्यक्रमही झाले.