बीसीएच्या प्रेशर्स स्टुडंट्ससाठी आयोजन
प्रतिनिधी /बेळगाव
एस.के.ई. सोसायटी संचालित गोविंदराम सक्सेरिया सायन्स कॉलेजच्या बीसीए विभागाने प्रेशर्स म्हणजेच नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी 12 आणि 13 नोव्हेंबर रोजी ‘इनसाइट-2021’ ओरिएंटेशन प्रोग्रामचे आयोजन केले होते. बीसीएचे सिनियर विद्यार्थी आणि शिक्षकवर्गाकडून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
श्वेता देवजी आणि गुपकडून सादर करण्यात आलेल्या नृत्यासह या सोहळय़ाचा शुभारंभ करण्यात आला. उद्घाटन सोहळय़ाला मुख्य अतिथी म्हणून अमित सौंदलगेकर (बिझनेस स्ट्रटेजी कन्स्टल्टंट, लिडरशिप अँड बिझनेस कोच) उपस्थित होते. तर मान्यवर अतिथी म्हणून बिंबा के. नाडकर्णी (एसकेई सोसायटी, बेळगाव), प्राध्यापक बी. एल. मजुकर (प्राचार्य, जीएसएस डिग्री कॉलेज) आणि प्राध्यापक प्रसाद खोडे (संचालक, जीएसएस बीसीए) उपस्थित होते.
प्राध्यापक खोडे यांनी उपस्थितांचे स्वागत करत बीसीए अभ्यासक्रमाचे पैलू विशद केले. तर मुख्य अतिथी सौंदलगेकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि ‘3ईज’ (एज्युकेशन, एक्सपीरियन्स अँड एक्सपोजर) यांचे महत्त्व समजावून सांगितले.
बीसीए विद्यार्थ्यांसाठी कारकीर्द घडविण्यासाठी असलेल्या अनेक संधी प्राचार्य मजुकर यांनी यावेळी सांगितल्या. तर प्राचार्य शीतल यांनी आभार मानले.
ओरिएंटेशन कार्यक्रमाच्या अंतर्गत प्रश्नमंजुषा, संवाद, सांस्कृतिक, एंट्रोडक्शन गेम्स, ट्रेजर हंट इत्यादींचे आयोजन करण्यात आले. यातून नव्या विद्यार्थ्यांना संवाद साधण्यास आणि इतरांसोबत जुळवून घेण्यास तसेच स्वतःमधील सुप्त गुणांना वाव देण्याची संधी मिळाली.