प्रतिनिधी / बेळगाव
दरवषीप्रमाणे यावषीही जीएसएस कॉलेजमध्ये ‘सृजन’ या विज्ञान उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. याचे उद्घाटन शुक्रवारी संस्थेचे क्हा. चेअरमन पंकज शिवलकर यांच्या हस्ते करण्यात आले. या उत्सवामध्ये प्रश्नमंजुषा, फोटोग्राफी, पीपीटी सादरीकरण अशा स्पर्धा घेण्यात आल्या.
उत्सवाचे औचित्य साधून जीएसएस कॉलेजच्या ग्रंथालयातर्फे ‘सायन्स ईन संस्कृत’ भित्तीचित्राचे प्रदर्शन आणि विज्ञानकोश, सायन्स विषयातील विश्वकोश आणि दुर्मीळ ग्रंथांचे प्रदर्शन भरविण्यात आले. यावेळी प्राचार्य डॉ. एन. डी. हेगडे, प्रा. व्ही. एल. मजूकर, डॉ. अनुजा नाईक, डॉ. एस. एस. देशपांडे, ग्रंथपाल नमिता सामंत आणि इतर कर्मचारीवर्ग उपस्थित होते.