प्रतिनिधी / बेळगाव
एसकेई सोसायटीच्या जीएसएस पीयू कॉलेजच्या भौतिकशास्त्र विभागाच्यावतीने बोसॉन क्लब ऑफ फिजिक्स नव्याने सुरू करण्यात आला. या अनुषंगाने दहा विविध विषयांवर स्पर्धा आयोजित करण्यात आली. यामध्ये पीयूसीच्या 34 विद्यार्थ्यांनी भाग घेतला. प्रमुख पाहुणे म्हणून एसकेईचे चेअरमन किरण ठाकुर, व्हा. चेअरमन एस. वाय. प्रभू, अशोक शानभाग, अजय आजगावकर, प्रा. प्रमोद हणमगोंड, प्राचार्य प्रणव पित्रे, प्रा. दत्तात्रय राव, प्राध्यापकवर्ग उपस्थित होता.
सृष्टी बागेवाडी हिने स्वागतगीत सादर केले. प्रा. दत्तात्रय यांनी स्वागत केले. प्रा. सुभाष देसाई यांनी पाहुणे आणि परीक्षकांचा परिचय करून दिला. प्रा. प्रवीण पाटील यांनी लोगो आणि स्पर्धेची माहिती दिली. स्पर्धेतील विजेते ओम कुंदगोळकर, वंशिका खारीट, फिओना डिसोजा यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविले. सूत्रसंचालन वैशाली भारती, प्रा. ज्योती होसूर, प्रा. प्राजक्ता घसारी यांनी केले. प्रा. अभिजित गवस यांनी आभार मानले.