प्रतिनिधी /बेळगाव
गोवा एनसीसी संचालनालयातर्फे बेळगाव शहरातील जीएसएस कॉलेजला 2020-21 चा सिनियर डिव्हिजन एनसीसीमध्ये सेकंड बेस्ट पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. रविवारी बेंगळूर येथे झालेल्या शानदार सोहळय़ामध्ये कर्नाटक-गोवा एनसीसी संचालनालयाचे प्रमख एअर कमोडोर बी. एस. कन्वर, (विशि÷ सेवा मेडल) यांच्या हस्ते फ्लाईट लेफ्टनंट आर. टी. कांबळे यांनी चषक स्वीकारला. बेळगाव एनसीसी ग्रुप कमांडर कर्नल के. श्रीनिवास, 25 कर्नाटक एनसीसी बटालियनचे प्रशासकीय अधिकारी लेफ्टनंट कर्नल नंदकुमार उपस्थित होते. यासाठी 8 कर्नाटक एअर स्क्वॉड्रनचे ग्रुप कॅप्टन पाटणकर व त्यांचे सहकारी, फ्लाईट लेफ्टनंट आर. टी. कांबळे, प्राचार्य बी. एल. मजुकर, एसकेई सोसायटीच्या संचालकांचे प्रोत्साहन लाभले.