प्रतिनिधी /बेळगाव
एसकेई सोसायटीच्या जीएसएस पीयु कॉलेज विद्यार्थी परिषदेचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून नौदल सेनेचे कमांडर सत्यम एम. भोसले उपस्थित होते. यावेळी त्यांनी जीवनात चिकाटी आणि जिद्द बाळगणे गरजेचे आहे, असे सांगितले.
प्रारंभी प्राचार्य प्रणव पित्रे यांनी स्वागत केले. प्रा. भारती सावंत यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. सूत्रसंचालन प्रा. एस. एस. कुलकर्णी व प्रा. सुषमा यांनी केले. प्रा. अनिल खांडेकर यांनी आभार मानले.
याप्रसंगी लता कित्तूर, ज्ञानेश कलाटणी, चेअरमन वाय. के. प्रभू, प्राचार्य प्रणव पात्रे, विद्यार्थी परिषदेचे उपाध्यक्ष प्रा. अनिल खांडेकर, शारिरीक शिक्षक प्रा. विनय नाईक, प्राध्यापक, विद्यार्थी प्रतिनिधी यश देशपांडे, विद्यार्थिनी प्रतिनिधी वैशाली जोशी, क्रीडा शिक्षक विनय नाईक व विद्यार्थी उपस्थित होते.