प्रतिनिधी /बेळगाव
एसकेई सोसायटीच्या गोविंदराम सेक्सारिया विज्ञान महाविद्यालय येथे स्वामी विवेकानंद जयंती (राष्ट्रीय युवा दिन) साजरी करण्यात आली. प्राचार्य बी. एल. मजुकर यांच्या उपस्थितीत स्वामी विवेकानंदांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. डॉ. आय. एस. कुंभार, प्रा. पी. एस. पाटील यावेळी उपस्थित होते.
यानंतर के. एम. गिरी सभागृहात भाषणाचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख पाहुणे म्हणून आरपीडी महाविद्यालयाचे तत्त्वज्ञानाचे निवृत्त प्राध्यापक डॉ. आय. एस. कुंभार उपस्थित होते. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रा. पी. एस. पाटील यांनी स्वागत केले. आत्येश्याम याने प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. सूत्रसंचालन आशिष कोचेरी याने केले. स्टेफी गामा हिने आभार मानले.