मार्चमध्ये आतापर्यंतचा 1.42 लाख कोटी रुपयांचा उच्चांक
अर्थव्यवस्था बाहेर पडत असून मागणी वाढू लागली आहे. लोकांची खरेदीही वाढली असल्याने जीएसटी संकलनात वाढ होत आहे. बहुतेक राज्यांनी आता कोरोना निर्बंध हटविले असून केवळ मास्क आणि सामाजिक अंतर एवढेच नियम सुरु ठेवले आहेत. काही राज्यांमध्ये मास्कचा उपयोगही ऐच्छिक करण्यात आला आहे. त्यामुळे बाजारपेठाही गजबजू लागल्या असून लग्नसराईत खरेदी आणखी वाढेल अशी अपेक्षा आहे. त्यामुळे 2022-2023 या नव्या आर्थिक वर्षाच्या प्रथम महिन्यात, अर्थात एप्रिलमधील संकलनासंबंधी सरकार आणि अर्थतज्ञ उत्सुक असल्याचे दिसत आहे.
मागणी, खरेदीत वाढ…
ड बाजारात मागणी वाढल्याने वस्तू-सेवा करसंकलनात मोठी वाढ
ड एप्रिलमधील संकलनासंबंधी अपेक्षा वाढल्या, आकडेवारीवर लक्ष
ड केंद्र सरकारने राज्यांची वस्तू-सेवा कर थकबाकीही भागविली
ड वाहने, घरे, विविध सेवा, इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या मागणीत वाढ