मुंबई
जीओनीने जीएसडब्ल्यू 3, जीएसडब्ल्यू 4 व जीएसडब्ल्यू 5 अशी तीन स्मार्टवॉचेस बाजारात दाखल केली आहेत. जीएसडब्ल्यू 3 सीनोरिटा हे वॉच खास महिलांसाठी तयार करण्यात आले असून त्याची किंमत 3 हजार 499 रुपये असणार आहे. जीएसडब्ल्यू 4 ऑलवेज ऑन हे वॉच मेटल बॉडीसह हार्टरेट मॉनिटर व इन बिल्ट ट्रकरसह असणाऱया फोनची किंमत 4 हजार 599 रुपये असणार आहे तर जीएसडब्ल्यू स्मार्ट लाईफ 160 एमएएच बॅटरीसह असणाऱया या स्मार्टवॉचची किंमत 2 हजार 499 रुपये आहे. 23 जूनपासून फ्लीपकार्टवर वरील स्मार्टवॉचची विक्री सुरु होणार आहे.