वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
फिच रेटिंग्स या संस्थेने चालू आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पादन (जीडीपी)दराबाबत संशोधनात्मक अंदाज व्यक्त केला होता. यामध्ये भारताचा जीडीपी दर 9.4 टक्क्यांनी घसरणार असल्याचे संकेत मांडले आहेत. या अगोदर फिचने भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये 10.5 टक्क्यांची घसरण राहण्याचा अंदाज मांडला होता. चालू आर्थिक वर्षातील दुसऱया तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्था निश्चित केलेल्या अंदाजापेक्षा जीडीपीच्याबाबतीत सुधारलेली दिसणार असल्याचे फिचने म्हटले आहे.
फिचने मंगळवारी सादर केलेल्या अहवालात महामारीमुळे निर्माण झालेली मंदीसदृश्य परिस्थिती आणि प्रभावीत झालेला जीडीपी यामध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी विविध योजना आखण्यावर भर देण्याची गरज निर्माण होणार असल्याचेही स्पष्ट केले आहे.