ब्रिटनमधील कोविड स्ट्रेनचा फैलाव जाणून घेणार
ब्रिटनमध्ये आढळून आलेल्या कोरोनाच्या नव्या संकरावताराचा भारतात किती फैलाव झाला हे जाणून घेण्यासाठी आता जीनोम स्वीक्वेंसिंगचा वापर होणार आहे. कोविड-19 विषयक राष्ट्रीय कृतिदलाने यासंबंधी सूचना केली आहे. प्रॉस्पेक्टिव सर्व्हिलान्स अंतर्गत सर्व राज्यांच्या बाधितांपैकी 5 टक्के जणांचे होल जीनोम सीक्वेंसिंग करण्यात येणार आहे. याकरता नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अंतर्गत एक जोनीम सर्व्हिलान्स कंसोर्टियम, आयएनएसएसीओजी निर्माण करण्यात आला आहे. हा सार्स-कोव-2 च्च्या फैलावणाऱया स्ट्रेन्सच्या सर्व्हिलान्ससाठी काम करणार आहे. सार्स-कोव-2 चे जीनोम सर्व्हिलान्स आवश्यक असल्याचे कृतिदलाने म्हटले आहे.
ट्रेसिंग आवश्यक
उत्परिवर्तनानंतरही उपचापद्धतीत बदल करण्याची गरज नाही. नवा संकरावतार अधिक संक्रामक असल्याने त्याच्याद्वारे संक्रमित होणाऱयांची ओळख पटवून त्यांना आयसोलेट करणे अत्यंत आवश्यक असल्याचे कोविड कृतिदलाने सांगितले आहे. सर्व्हिलान्स धोरणाच्या अंतर्गत 21 ते 23 डिसेंबरदरम्यान ब्रिटनमधून भारतात आलेल्या प्रत्येक प्रवाशाचा चाचणी करण्यात आली आहे. कृतिदलाने संकरावताराच्या पार्श्वभूमीवर उपचारपद्धत, चाचण्यांची रणनीति आणि सर्व्हिलान्सवर चर्चा केली आहे.
उत्परिवर्तन सामान्य
ब्रिटनच्या सार्स-कोव-2 च्या स्ट्रेन्सचा लवकर शोध लावणे आणि त्यांचा फैलाव रोखण्यासाठी विस्तृत जीनोमिक देखरेख सुरूच ठेवण्याचा प्रस्ताव आहे. परंतु अन्य सर्व आरएनए विषाणूंप्रमाणे सार्स-कोव-2 उत्परिवर्तित होतच राहणार आहे. विषाणूला सामाजिक अंतर, हात स्वच्छ ठेवणे आणि मास्क परिधान करणे यासारख्या पावलांनी आणि प्रभावी लसीनेही रोखता येणार असल्याचे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.