अनेक सुविधांचा समावेश, किंमत 30 लाखावर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
जीप इंडिया कंपनीने आपली नवी कार ट्रेलहॉक भारतीय बाजारात लाँच केली आहे. कंपास या गाडीची नवी सुधारीत आवृत्ती ट्रेलहॉकच्या माध्यमातून कंपनीने भारतीय रस्त्यावर उतरवली आहे.
भारतात या नव्या गाडीची किंमत 30 लाख रुपये (एक्स शोरुम) इतकी असणार आहे. सदरची गाडीची किंमत ही सुरूवातीची असणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
या गाडीच्या बाह्य आवरणामध्ये सुंदर असा बदल करण्यात आला असून तांत्रिक दृष्टय़ाही नव्याने फेरबदल करण्यात आले आहेत. गाडीला एलइडी प्रोजेक्टर हेडलॅम्पची सोय असून गाडी चालवण्यासाठी आरामदायी असल्याचेही कंपनीने म्हटले आहे. नव्याने पुर्नरचित केलेल्या गाडीला बंपरची सोय आहे. समोरच्या बाजुला ग्रे फिनीश्ड ग्रिल आणि त्याच्या बाजुला नव्या स्लिमर हेडलँपची रचना आहे. 205 एमएमचे ग्राऊंड क्लिअरन्स तसेच छोटे आर 17 ऑलॉय व्हील याला आहेत.
इतर वैशिष्टय़े पाहुया
w पॅनॉरॉमीक सनरुफ
w डय़ुअल झोन क्लायमेट कंट्रोल
w वायरलेस स्मार्टफोन चार्जिंग
w व्हेंटीलेटेड सिट्स
w 360 डिग्री पार्किंग कॅमेरा
w इंजीन-2.0 लि. मल्टिजेट (डिझेल)
w 350 एनएम टॉर्क
w 167 बीएचपी पीक पॉवर
w 9 स्पीड ऑटोमेटीक ट्रान्स्मीशन