प्रतिनिधी/ बेळगाव :
लॉकडाऊनमुळे 23 मार्चपासूनच जीम बंद करण्यात आल्या आहेत. मात्र आता विविध उपक्रमांना सरकारने मुभा देण्यास सुरु केली आहे. तेंव्हा जीम सुरु करण्यास 1 जून पासून परवानगी द्यावी, अशी मागणी बेळगाव शहर जिम असोसिएशनच्यावतीने मुख्यमंत्र्यांचे राजकीय सचिव शंकरगौडा पाटील यांच्याकडे निवेदनाव्दारे करण्यात आली.
लॉकडाऊनमुळे जीम मालकांचे मोठे नुकसान झाले आहे. जागेचे भाडे देणे अवघड झाले आहे. जीम चालकांनी विविध बँकांमधून कर्जे घेवून जीमचे साहित्य खरेदी केले आहे. मात्र आता कोरोनामुळे जीम बंद करण्यात आल्यामुळे मोठी समस्या निर्माण झाली आहे. सलग दोन महिने जीम बंद आहेत. तेंव्हा आता आम्हाला व्यवसाय करण्यास मुभा द्यावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली.
भाजपचे किरण जाधव, जीम असोसिएशनचे अध्यक्ष किरण कवळी, उपाध्यक्ष चेतन तहसीलदार, कार्यदर्शी महांतेश मोरे, निलकंठ मास्तमर्डी यांच्यासह जीम चालक उपस्थित होते.