प्रतिनिधी /बेळगाव
रेल्वेमध्ये चढताना तोल गेल्याने रेल्वेसोबत फरफटत जाणाऱया मुलीला व तिच्या वडिलांना वाचविणाऱया लोको पायलटचा सन्मान करण्यात आला. तरुण भारतने दिलेल्या बातमीची दखल घेऊन रेल्वे कर्मचारी व सुरेंद्र अनगोळकर फौंडेशनतर्फे लोकोपायलट अनिरब गोस्वामी यांचा रविवारी रेल्वेस्थानकामध्ये सत्कार करण्यात आला.
शनिवारी सकाळी 11 वा. अजमेरहून बेंगळूरला जाणारी एक्स्प्रेस स्थानकात दाखल झाली. आईस्क्रिम घेण्यासाठी लहान मुलगी व तिचे वडिल स्थानकावर उतरले. आईस्क्रिमच्या नादात रेल्वे सुरू झाल्याचे त्यांच्या लक्षात आले नाही. रेल्वे सुरू झाल्याचे लक्षात येताच त्यांनी बोगीकडे धाव घेतली. वेग वाढल्याने ती मुलगी व तिचे वडिल रेल्वेसोबत फरफटत गेले. डय़ूटी संपवून थांबलेले लोकोपायलट अनिरब गोस्वामी यांच्या ते लक्षात येताच त्यांनी ती मुलगी व तिच्या वडिलांना वाचविण्याचा प्रयत्न केला. यामध्ये त्यांच्या गुडघ्यालाही दुखापत झाली. लोकोपायलटने प्रसंगावधान दाखवत दोन जीव वाचविले. ही बातमी तरुण भारतने प्रसिद्ध केली.
या बातमीची दखल घेत रविवारी रेल्वे कर्मचारी व सुरेंद्र अनगोळकर फौंडेशनतर्फे लोको पायलटचा सत्कार करण्यात आला. रेल्वेचे वरि÷ तिकिट कलेक्टर सुनील आपटेकर यांनी लोकोपायलट अनिरब यांच्या कार्याचे कौतुक केले. यावेळी रेल्वे कर्मचारी तसेच सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.