ओरोस/ प्रतिनिधी-
जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या पराशर जगन्नाथ सावंत (राहणार कोनाळकट्टा) शैलेश सुरेश दळवी (राहणार दोडामार्ग सुरुची वाडी) लक्ष्मण उर्फ बाळा सखाराम नाईक (राहणार उसप) आणि श्रीकृष्ण उर्फ प्रवीण तुळशीदास गवस (राहणार मणेरी) या चारही संशयित आरोपींचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळून लावला आहे.
प्रवीण नाडकर्णी आणि एकनाथ नाडकर्णी ज्यांच्यावर दोन जानेवारी रोजी राजकीय वैमनस्यातून हल्ला झाला होता यात त्यांना जबर मारहाण करण्यात आली होती. याप्रकरणी प्रवीण नाडकर्णी यांनी दोडामार्ग पोलीस स्थानकात तक्रार दिली होती. त्यानुसार संशयित आरोपीवर ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातील अटक टाळण्यासाठी संशयीतांनी जिल्हा व न्यायालयाने सत्र न्यायालयाकडे जामिनासाठी अर्ज केला होता.
दरम्यान या गुन्ह्यासाठी वापरलेले दांडे व संशयितांकडे मोबाईल जप्त करणे आवश्यक असल्याने त्यांना अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर करू नये अशी विनंती सरकार पक्षाकडून करण्यात आली होती. अशी माहिती सरकार पक्षाच्या वतीने काम पाहणारेसहाय्यक सरकारी वकील अॅडवोकेट रुपेश देसाई यांनी दिली. तसेच याप्रकरणी वादीच्या वतीने भरत प्रभु यांनी बाजू मांडली