वार्ताहर / माशेल
फोंडा जीव्हीएमच्या कदंबा बसस्थानकाकडे जाणाऱया रस्त्याच्या कडेला साचलेला कचरा बांदोडा पंचायतीचे सरपंच राजेश नाईक यांनी जेसीबीच्या सहाय्याने उचल करून परिसर स्वच्छ केला. यापुढे जीव्हीएम सर्कलजवळ उघडय़ावर कचरा फेकणाऱयावर कारवाई करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.
यावेळी बोलताना नाईक म्हणाले की कोरोनाच्या काळात परिसरातील अस्वच्छतेमुळे आरोग्याची समस्या उदभवू नये यासाठी सर्व कचऱयाची उचल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. आता या रस्ताच्या दोन्ही बाजूला फुलझाडे लावून सुशोभिकरण करण्यात येईल. त्याची देखरेख वनखाते किंवा पंचायत करेल. यापुढे कचरा टाकणाऱयाची खैर नसून सदर प्रकारावर आळा घावलण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरेही बसविण्यात येईल जर एखाद्याला इथे कचरा टाकताना कॅमेऱयात टिपल्यास त्याला शोधून काढून त्याच्यावर कारवाई केली जाईल. या सामाजिक कार्यास सर्वांनी सहकार्य द्यावे असे आवाहन सरपंच राजेश नाईक यांनी केले आहे.