प्रतिनिधी /पणजी
संपूर्ण गोवा राज्यात 21 डिसेंबर 2021 रोजी बाल भवन द्वारे आयोजित नाताळांच्या कॅरल्स गाण्याच्या प्रतियोगीतेत जी.एस. आमोणकर विद्यालयाने प्रथम उत्तेजनार्थ बक्षीस पटकावले आहे. शाळेच्या विद्यार्थ्यांनी तीन कॅरल्स गायली. त्यांच्या गटात निधीपा केरकर, ध्रुवी वेर्णेकर, फ्र?न्सन डिसूझा, अश्विन केरकर, दुर्गा अळवे, अदिती परब मयेकर, मैत्री नाईक व कोमल पोकळे यांनी कॅरल्सचे गायन केले तर सेवा परब, प्रांजल नाईक व ट्विषा शेटगांवकर यांनी त्यांना संगीताची साथ दिली. शाळेची पूर्व विद्यार्थिनी वालुशा डिसोझा व संगीत शिक्षक श्री अक्षय हळर्णकर व सौ. रेश्मा शेटय़? यांचे प्रशिक्षण मुलांना लाभले.
शाळेच्या कमिटीचे अध्यक्ष ?ड. संजय उसगांवकर, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. गायत्री शिरसाट व शिक्षक वर्ग यांनी या मुलांचे कौतुक करून अभिनंदन केले.