प्रतिनिधी / बेळगाव
टिळकवाडी येथील जी. जी. सी. इंग्रजी शाळेत इयत्ता 10 वी च्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा सत्राचे आयोजन शाळेच्या फडणीस सभागृहात करण्यात आले. व्यासपीठावर प्रमुख वक्ते सेंटपॉल्स पदवीपूर्व कॉलेजचे प्रशासक फादर स्टिव्हन अल्मेडा व प्राचार्या डॉ. पद्मिनी रविंद्रन शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ. नवीना शेट्टीगार उपस्थित होते.
प्रारंभी किर्तना सुतारने स्वागत गीत म्हटले. डॉ. नवीना शेट्टीगार यांनी उपस्थित वक्त्यांचे स्वागत केले. भक्ती रेडेकरने मान्यवरांचा परिचय करून दिला. पहिल्या सत्रात डॉ. पद्मिनी रविंद्रन यांनी वेळ व ताण व्यवस्थापन याबाबत विविध उदाहरणे देत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. फादर स्टिवन अल्मेडा यांनी शक्ती व विश्रांती यामुळे तुम्ही ताणातून बाहेर याल तसेच जशी तुमची संगत असेल तसे तुम्ही घडाल असे सांगितले. व चांगल्या संगतीत रहाण्याचे आवाहन केले. डॉ. नवीना शेट्टीगार यांनी पुष्पगुच्छ व भेटवस्तू देवून वक्त्यांचा गौरव केला. कार्यक्रमास ट्रस्टचे व्ही. एन. जोशी, शिक्षकवर्ग विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन अनन्या रथकरने केले. व अमित पाटीलने आभार मानले.