वृत्तसंस्था /ओलोमाउस, झेक प्रजासत्ताक
भारताचा स्टार टेबल टेनिसपटू जी. साथियानने युक्रेनच्या येवहेन प्रीश्चेपाचा एकतर्फी पराभव करून आयटीटीएफ झेक आंतरराष्ट्रीय ओपन टेनिस स्पर्धेचे जेतेपद पटकावले.
जागतिक क्रमवारीत 39 व्या स्थानावर असणाऱया साथियानला येथे अग्रमानांकन मिळाले होते. जेतेपदाच्या लढतीत त्याने प्रीश्चेपावर 11-0, 11-6, 11-6, 14-12 अशी मात केली. मागील आठवडय़ात त्याने बुडापेस्टमधील डब्ल्यूटीटी कंटेन्डर स्पर्धेत मनिका बात्रासमवेत मिश्र दुहेरीचे जेतेपद पटकावले होते.