सात जणांना अटक, खडेबाजार पोलिसांची कारवाई
प्रतिनिधी/ बेळगाव
कडोलकर गल्लीजवळील कोंबडी बाजारात शनिवारी रात्री जुगारी अड्डय़ावरील कारवाईत पोलिसांनी 11 हजार 850 रुपये जप्त केले असून सात जणांना अटक केली आहे. या अड्डय़ाचा प्रमुख चालक फरारी झाला आहे.
गजानन राजू माने, महादेव बाळकृष्ण मेणसे, दोघेही राहणार भेंडीबाजार, रुपेश इराप्पा मंडोळकर, रा. मेणसे गल्ली, ओंकार गणपत कडोलकर, रा. कडोलकर गल्ली विघ्नेश विजय कोले, रा. भोई गल्ली, बाळू अशोक पिरांजे, रा. कोरे गल्ली, शहापूर, ऋषभ किरण वरुर, रा. कुलकर्णी गल्ली या सात जणांना अटक करण्यात आली आहे.
प्रमोद कडोलकर, रा. कडोलकर गल्ली याच्यावरही एफआयआर दाखल करण्यात आला आहे. तो फरारी असल्याचे पोलिसांनी सांगितले. खडेबाजारचे एसीपी ए. चंद्राप्पा व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली आहे. या परिसरात गेल्या काही महिन्यांपासून जुगारी अड्डा सुरू होता. पोलिसांनी अचानक छापा टाकून सात जुगाऱयांना अटक केली आहे.