प्रतिनिधी/ सातारा
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या अनेकजण घरीच असल्याने काही रिकामटेकडय़ांना जुगाराची हौस लागली आहे. त्यामुळे शहरातील अनेक जुगार अड्डे हाऊसफूल दिसू लागल्याने पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. सोमवारी सायंकाळी सातारा शहर पोलीस ठाण्यानजिक व वाढेफाटय़ावर पत्र्याच्या शेडच्या आडोशाने जुगार व्यवसाय चालवणाऱया अड्डय़ांवर सातारा शहर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱयांनी छापा टाकला. या कारवाईत चौघांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून यापैकी तिघांना पोलिसांनी अटक केली असून त्याच्ंयाकडून जुगाराचे साहित्य व 8 हजार रुपयांची रोख जप्त केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, येथील वाढेफाटय़ावर शिवनेरी चिकन सेंटरच्या शेजारी असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये छापा टाकून पोलिसांनी सुनील अनिल कुंभार रा. संगमनगर व सचिन निशिकांत कांबळे रा. खेड, ता. सातारा या दोघांना अटक केली. त्यांच्या ताब्dयातील 7 हजार 140 रुपये रोख व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
दरम्यान, शहर पोलीस ठाण्यानजिक बसस्थानकाकडे जाणाऱया रस्त्यावर असलेल्या प्रिया व्हरायटीजच्यानजिक पत्र्याच्या शेडमध्ये जुगार चालवणाऱया शेखर राजाराम परदेशी वय 51 रा. सातारारोड, ता. कोरेगाव यास अटक केली. यावेळी त्याच्या ताब्यातील रोख 830 रुपये रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त केले असून या अड्डय़ाचा मालक यासिन इप्बाल शेख रा. तेली खड्डा, शनिवार पेठ, सातारा याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.