प्रतिनिधी/ सातारा
सातारा येथील शहर पोलिसांनी जुगार प्रकरणी आठ जणांवर कारवाई करून त्यांच्याकडून 46 हजार 890 रुपयांचा ऐवज व जुगाराचे साहित्य सात मोबाईल हस्तगत केले आहेत.
याबाबत सातारा शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की सातारा शहरात जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यावरून पोलिसांनी कारवाई केली असता सुरज राजेंद्र फडतरे (वय 23 रा. रविवार पेठ), मुनिराज किशोर शर्मा (वय 37 रा. सय्यद कॉलनी करंजे पेठ सातारा) हे व त्यांचा मालक वासीम इक्बाल शेख (रा. शनिवार पेठ सातारा) हे यांच्या फायद्याकरता मटका जुगार आकडय़ावर लोकांच्याकडून पैशाचे करून बेकायदा बिगर परवाना मटका चालवत असताना आढळून आल्याने व भगवान रामचंद्र बनसोडे ( वय 40 रा. निलंगा जिल्हा लातूर सध्या रा. दौलत नगर), राजेंद्र शशीपाल नहेब (रा. देसाई कॉलनी सदर बाजार) मारुती शामू उबाळे (वय 30 रा. गणेश कॉलनी दौलतनगर करंजे), अनिल लक्ष्मण रणदिवे (वय 63 रा. जरंडेश्वर नका सदर बाजार), मधुकर रामजी कांबळे (वय 49 रा. शिवशंभो कॉलनी दौलत नगर), पवित सतीश तोडगे (वय 26 रविवार पेठ सातारा) हे आढळून आल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून 46 हजार 890 रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला. त्यामध्ये जुगाराचे साहित्य दोन मोटरोला कंपनीचे मोबाईल एम आय, ओपो, विवो कंपनीचे पाच मोबाईल यांचा समावेश असून सातारा शहर पोलीस तपास करत आहेत.