प्रतिनिधी/ वाई
वाईच्या वैभवात भर घालणारा कृष्णा पूल आज जमिनदोस्त झाला असला तरी नवीन पुलही त्याच दिमाखात लवकरच उभा राहणार आहे. या पुलाबद्दल अनेक वाईकरांना उत्सुकता लागून राहीला आहे. सदर पुल 8 महिन्यांच्या कालावधीत पूर्ण होणार असून 40 फूट रूंदीचा हा पूलाने वाहतूकीच्या कोंडीचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.
जूना कृष्णापूल 140 वर्षांपेक्षा जास्त जूना झाल्याने प्रशासनाच्यावतीने नवीन पुलाचा प्रस्ताव पारीत करण्यात आला होता. त्यानंतर आज सदर कामास प्रारंभ झाला आहे. या पूलाची लांबी 100 मीटर असून उंची अंदाजे 8 मीटर आहे. प्रस्तावित पुलाची एकूण रूंदी 12 मीटर, कॅरेज वेची रूंदी 9 तर दोन्ही बाजूस 1.5 मीटरचे फुटपाथ असणार आहेत. 13.50 मीटर रूंदीचे 6स्पॅन आहेत. तरर पुलावर नदीच्या दोन्ही बाजूस 7 फूट बाय 10 फूट मापाच्या चार ठिकाणी प्रोजेक्टेड बाल्कनी उभारण्यात येणार आहेत. यावरून वाईचे व नदीचे दृष्य पाहता येणार आहे. फुटपाथवरील पेव्हरब्लॉकच्या खालून पाण्याच्या, इलेक्ट्रिक व टेलिफोन लाईन्स टाकण्यात येणार आहेत.
पुल पुर्वीसारखा दिसण्यासाठी व हेरीटेज लूकचाही यात विचार करण्यात आला असून पुलावर फ्लेम फिनिश्ड राजस्थान ब्लॅक ग्रेनाईटचे 18 ते 20 मी. मी.जाडीचे क्लॅडिंग, रेलिंगए, बाल्कनी कॉर्नस आणि इतर डिझाईनसाठी प्रस्तावित करण्यात आले आहे. या पुलाचे स्थानीक महत्व लक्षात घेवून त्याला पुर्वीच्या ढंगात बांधण्यात येणार आहे.
सदर पुलाच्या जागी होणारा नवीन पूल हा 40 फूट रूंदीचा होणार असल्याने त्यावरून होणार्या वाहतूकीचा प्रश्न मोठया प्रमाणावर सूटणार आहे. पुलाच्या हेरीटेज लुक व आर्किटैक्चरल इलेमेंटसमुळे वाई शहराच्या सांस्कृतिक वारशात व सौंदर्यात भर पडणार आहे.