प्रतिनिधी/ बेळगाव
गणेशपेठ, जुनेबेळगाव येथील गणपती देवस्थानमध्ये सोमवारी दिपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. सोमवती अमावस्येनिमित्त संपूर्ण मंदिर परीसर दिव्यांनी उजळला होता. या निमित्त दर्शनासाठी सकाळपासूनच भाविकांनी गर्दी केली होती.
दिपोत्सवानंतर आरती व तीर्थप्रसादाचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमावेळी संतोष शिवणगेकर, अनंत पाटील, शंकर गडदे, लक्ष्मण रावजीचे, उमाजी पाटील, विनायक बोलके, संदीप पाटील, जोतिबा बेनके, प्रसाद वाळके, जोतिबा भोसले, मोहन बेनके, बबलू खन्नूकर, महेश पाटील, किरण पाटील, सिद्धार्थ नाचरे, सोमनाथ देवजीचे, सोमेश बेनके, सुधीर पाटील यासह महिला व युवक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.