प्रतिनिधी/ पणजी
बायंगिणी-जुने गोवे येथील नियोजित कचरा प्रकल्पाच्या विरोधात काँग्रेsस पक्षाने पुन्हा एकदा आवाज उठवला असून त्यास विरोध केला आहे. हा प्रकल्प होऊ देणार नाही, असा इशाराही काँग्रेsसने दिला आहे. केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक हे आता आपल्या मुलाच्या जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी त्या प्रकल्पाला विरोध करण्याचे नाटक करीत असून हिंमत असल्यास त्यांनी हा प्रकल्प रद्द करून दाखवावा, असे आव्हान काँग्रेsस दिले आहे. मंत्री नाईक यांनी हा प्रकल्प रद्द केला तर काँग्रेsसचे तेथील जिल्हा पंचायतीचे उमेदवार विशाल वळवईकर यांनी उमेदवारी मागे घेऊन नाईक यांना पाठिंबा देऊ, असे जाहीर केले आहे.
पणजीत काँग्रेsस भवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेत प्रवक्ते अमरनाथ पणजीकर, विशाल वळवईकर, रूडॉल्फ फर्नाडिस आणि टोनी फर्नाडिस यांनी कचरा प्रकल्पावरून सरकारवर हल्लाबोल केला. जुने गोवे हे जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ असून तेथे कचरा प्रकल्प करण्यास तेथील जनतेचा पूर्ण विरोध आहे. तो विरोध डावलून तेथे सरकारचा कचरा प्रकल्प करण्याचा प्रयत्न सुरू आहे. 2003 पासून हा विषय रेंगाळत पडला असून त्यास तेथे विरोधच होत आहे. एवढी वर्षे मंत्री नाईक गप्प होते आणि आता त्यांचा मुलगा जिल्हा पंचायत निवडणुकीत विजयी व्हावा म्हणून त्यांना कचरा प्रकल्पाबाबत उपरती झाल्याची टीका काँग्रेsस प्रवक्त्यांनी केली.
तर तो प्रकल्प संपूर्ण गोव्यासाठी लज्जास्पद ठरले
गोव्यात इतर अनेक ठिकाणी अनेक जागा आहेत. तेथे हा प्रकल्प साकार करा. जुने गोवे येथे करू नका. ते ठिकाणी गोंयच्या सायबाचे आहे. तो तुम्हाला सोडणार नाही. एकाला धडा शिकवली आहे. आता मंत्री नाईक यांनाही तो सायब सोडणार नाही, अशा इशारा टोनी फर्नाडिस यांनी दिला. जुने गोवे येथे कचरा प्रकल्प केला तर तो संपूर्ण गोव्यासाठी लज्जास्पद ठरेल, असेही पणजीकर यांनी सांगितले. हा प्रकल्प रद्द करण्यात यावा आणि तशी अधिसूचना जारी करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.