प्रतिनिधी/ तिसवाडी
जुने गोवे येथे चतुर्थी बाजाराचा लाभ जुने गोवे, दिवाडी, करमळी, खोर्ली, आजोशी, रायबंदर, मळार येथील लोकांना व्हावा म्हणून हा बाजार भरविण्यात आला आहे. तो या भागातीतल लोकांना म्हणजे पवर्णीच ठरणार आहे, असे प्रतिपादन आमदार पांडुरंग मडकईकर यांनी केले.
प्रारंभी आमदार पांडुरंग मडकईकर यांनी चतुर्थी बाजारचे फित कापून उद्घाटन केले. यावेळी त्यांच्यासमवेत जुने गोवेच्या सरपंच जनिता मडकईकर, पंच सदस्य तुळशिदास कवळेकर, विश्वास कुट्टीकर, सचिव आशिष नाईक, पंच मेघश्याम पर्वतकर, स्वयंपुर्ण गोंयचे आशितोष शिरवडेकर व अन्य उपस्थित होते.
यावेळी सर्व महिला भगिनी सर्व प्रथम स्वागत गीत सादर केले. त्यानंतर समई प्रज्वलित करून आमदार पांडुरंग मडकईकर यांनी उद्घाटक केले. यावेळी त्यांना पुष्पगुच्छ देण्यात आली.
याप्रसंगी रेखा वांटेकर म्हणाल्या की, आजची स्त्रीशक्ति ही सर्व प्रकारावर मात करुन पुढे जाणारी आहे. जनिता मडकईकर म्हणाल्या की, महिला वर्गाला सगळय़ांनी हातभार लावण्याची गरज आहे. आशितोष शिरवडेकर यांचेही समयोचित भाषण झाले.
हा चतुर्थी बाजार दि. 9 रोजी पर्यंत सकाळी 8 ते सायंकाळी 7 वा. सुरू असेल. आभार प्रदर्शन विश्वास कुट्टीकर यांनी मानले. त्यानंतर आमदार पांडुरंग मडकईकर यांनी सर्वं दुकानाची माहिती मिळवली.