प्रतिनिधी / बेळगाव
बेळगाव शहरात तीक्ष्ण हत्याराने तरूणाचा निर्घूण खून झाल्याची घटना गुरूवारी सकाळी 17 डिसेंबर रोजी उघडकीस आली. जयपाल गरानी वय 38 रा. रथ गल्ली जुने बेळगाव असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे. जुने बेळगाव येथील लक्ष्मी तालीमच्या बाजूला असलेल्या मोकळय़ा जागेत गुरूवारी सकाळी त्याचा मृतदेह आढळला. सदर तरूणावर अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने वार करून त्याला ठार केले. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार जयपाल हा पूर्वी ड्रायव्हरचे काम करत होता. बुधवारी रात्री हा खून झाला असावा अशी शक्मयता आहे. घटनास्थळी मयताचे नातेवाईक आक्रेश करत होते. बघ्यांची घटनास्थळी एकच गर्दी झाली होती.