कोटय़वधींमध्ये विक्रीस तयार
डोंगरांदरम्यान वसलेले एक जुने रेल्वेस्थानक, भोवताली वनराई असा परिसर म्हणजे वास्तव्यासाठीचे सर्वोत्तम ठिकाण. अशाच एका परिसरातील रेल्वेस्थानकाला आता घरात रुपांतरित करण्यात आले असून ते विक्रीसाठी तयार आहे. ब्रिटनच्या डिवोन येथील हे स्थानक हॉल्टपूर्वी एक्स व्हॅली रेल्वेचा हिस्सा होते. ही एक ब्रँच लाइन होती, जी ग्रेट वेस्टर्न रेल्वेशी जोडलेली होती. याची सुरुवात 1 मे 1885 मध्ये झाली होती.
कोटय़वधींची किंमत
आता या जुन्या रेल्वेस्थानकाचे नुतनीकरण करण्यात आले आहे. हे छोटेसे रेल्वेस्थानक कुणाचेही घर ठरु शकते तसेच कार्यालय देखील. याचे विक्री मूल्य 5,50,000 युरो निश्चित करण्यात आले आहे. भारतीय चलनाच्या हिशेबाने ही रक्कम सुमारे 5.6 कोटी रुपये होणार आहे.
बंद झाले होते स्थानक
1923 मध्ये या रेल्वेस्थानकामधील कर्मचारीवर्ग हटविण्यात आला होता. त्याच्या 40 वर्षांनी हे रेल्वेस्थानक पूर्णपणे बंद करण्यात आले. रेल्वे यंत्रणेचे ब्रिटनमध्ये राष्ट्रीयकरण करण्यात येणार असल्याने हे पाऊल उचलण्यात आले होते.
घराचे स्वरुप
या स्थानकामधील कामे कालौघात बंद करण्यात आल्यावर याला एका घराचे स्वरुप देण्यात आले. प्लॅटफॉर्मच्या बाजूने असलेल्या खोलीला सिटिंग रुम करण्यात आले. तिकीट ऑफिसला बेडरुम करण्यात आले. आता या मालमत्तेचे नुतनीकरण केले गेले असून याच्यानजीक एक तलाव देखील आहे. याच्या परिसरात एक मोठे उद्यानसुद्धा आहे. रेल्वेस्थानक पूर्णपणे लाकडाने तयार करण्यात आलेले आहे.
पायपीट करावी लागणार
या स्थानकापर्यंत पोहोचण्यासाठी काही अंतराची पायपीट करावी लागणार आहे. कारण येथे पायीच जाता येते. या रेल्वेस्थानकात दोन रिस्पेशन, दोन गार्डन रुम, एक सिटिंग रुम आणि किचनसह तीन बेडरुम्स आहेत.