आणि जुन्नर, आंबेगाव ग्नतालुक्यांमध्ये पिकवलेला शिवनेरी आंबा या दोन जातींमधील फरकाचा अभ्यास करण्यासाठी आणि त्याला (जीआय) हापूसचा दर्जा मिळावा यासाठी शिवनेरी आंब्याचे वेगळेपण सिद्ध करण्यासाठी पुणे जिल्हा प्रशासनाने संशोधन संस्थांशी संपर्क साधला आहे.
या प्रकल्पासाठी जिल्हा नियोजन समितीकडून 26 लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे. जुन्नरमधील आंबा उत्पादकांनी तेथील आंब्याची चव आणि दर्जा कोकणातून येणाऱया आंब्यापेक्षा वेगळा असल्याचे सांगत भौगोलिक संकेत मिळण्यासाठी जिल्हा नियोजनच्या माध्यमातून निधी मिळवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. कोकण हापूस आणि शिवनेरी आब्यांच्या रासायनिक चाचण्या केल्या जात आहेत. याबाबत पुण्याचे जिल्हा कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बोटे म्हणाले की, जीआय दर्जासाठी प्रस्ताव तयार करण्यासाठी आम्ही कृषी विज्ञान केंद्र नारायणगावला मध्यम एजन्सी म्हणून नियुक्त केले आह़े
या फळाला जीआय टॅग मिळावा यासाठी जुन्नर आणि आंबेगाव येथील आंबा उत्पादक एकत्र आले आहेत. त्यांच्या मते आंब्यासाठी जीआय मानांकन आवश्यक आह़े ‘शिवनेरी आंबा वाशी मार्केटला खूप लोकप्रिय आहे. या आंब्याची निर्यातही होत आहे. रत्नागिरी हापूसला यापूर्वीच जीआय टॅग देण्यात आला आहे. आता शिवनेरी आंब्याला जीआय टॅग मिळवण्यासाठी या दोन आंब्यांमधील फरक सिद्ध करावा लागेल. आंबेगावमधील 4 आणि जुन्नरमधील 7 गटांसह शेतकरी उत्पादक संघटनांनी जीआयसाठी नोंदणी केली आहे. जीआय दर्जासाठी अर्ज सादर करावा लागतो. त्यात रत्नागिरी हापूस आणि शिवनेरी आब्यांमध्ये काय फरक आहे, ग्राहकांच्या प्रतिक्रिया काय आहेत आणि व्यापाऱयांचे काय मत आह़े याची माहीती देण्यात येणार असल्याचे जिल्हा कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बोटे यांनी सांगितले.
शिवनेरी हापूसही वैशिष्टय़पूर्ण
जुन्नरमधील शिवनेरी आंबा उत्पादक नितीन काळे म्हणाले की, ‘रत्नागिरी हापूसचा हंगाम संपला की शिवनेरी आंबा बाजारात येत़ो त्यामुळे सहसा शिवनेरी आंब्याचा दर जास्त असतो. या दोन्ही आंब्याच्या सुगंध आणि चवीमध्ये फरक आहे. नैसर्गिकरित्या दोन्ही फळांची वैशिष्टय़े वेगवेगळे आहेत़ त्यांच्या शेतातील आंबे जपानला निर्यात झाल्याची माहिती आंबा उत्पादक काळे यांनी दिल़ी
हापूस एकच…!
हापूस हा पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी सिंधुदुर्ग या पाच जिह्यांमध्ये पिकणारा तसेच सहयाद्रीच्या कडा व समुद्र व लाल, कातळी जमीन व खाडीकिनाऱयाचा भागामध्ये पिकणारा हापूस आह़े इतर प्रातांमधील आंब्याला कायदेशीररित्या हापूस संबोधता येणार नाह़ी हापूस हा शब्द जीआय मानांकत 5 जिल्हयांसाठी आह़े कोणीही कितीही प्रयत्न केले तरी हापूस हा शब्द आपल्यासाठी राखीव असल्याने इतर कोणत्याही अंाब्याला हापूस म्हणून विक्री करता येणार नाह़ी