प्रतिनिधी / बेळगाव
महानगरपालिकेतील खाते बदल नाव नोंदणी करण्यास विलंब केल्याप्रकरणी वॉर्ड क्लार्क आणि महसूल निरीक्षकांचा सत्कार करण्यात आला. या घटनेबद्दल मनपा कार्यालयात खळबळ माजली असून खाते बदलण्याच्या कामाची जबाबदारी मुख्य कार्यालयातच पूर्ण करावी, असे निवेदन महसूल निरीक्षकांनी महापालिका आयुक्तांना दिले आहे. तसेच मनपा कर्मचाऱयांचा अवमान केल्याच्या घटनेचा बेळगाव महापालिका नोकर विकास संघटनेच्यावतीने निषेध करण्यात आला.
महापालिकेच्या रिसालदार गल्लीतील महसूल विभागातील कर्मचाऱयांनी मालमत्तेच्या नोंदी उशिरा केल्याप्रकरणी वकील संघटनेच्यावतीने महसूल निरीक्षक आणि वॉर्ड क्लार्कचा हार घालून सत्कार करण्याचा गांधीगिरी उपक्रम हाती घेतला. या घटनेबद्दल सदर कर्मचाऱयांनी नोकर संघटनेकडे धाव घेऊन घटनेची तक्रार नोंदविली आहे. त्यामुळे बेळगाव महापालिका नोकर संघटनेच्यावतीने घटनेचा निषेध नोंदविण्यात आला आहे. खाते बदलण्याच्या फाईल मंजुरीला विलंब झाला आहे. सदर माहिती देत असताना कर्मचाऱयांचा व्हिडिओ रेकॉर्डिंग करून फेसबुक व समाज माध्यमावर अपलोड करण्यात आला आहे. पण जनतेला न्याय देणाऱया व कायद्याचे रक्षण करण्यासाठी कार्यरत असणाऱया वकिलांनी अशा प्रकारचा निंदनीय प्रकार करणे अयोग्य आहे. सरकारी कर्मचाऱयांच्या कामात अडथळा करून व्हिडिओ चित्रीकरण करून कर्मचाऱयांचा अवमान केला आहे. त्यामुळे बेळगाव महानगरपालिका नोकर संघटनेच्यावतीने घटनेचा निषेध नोंदविण्यात आला आहे. तसेच असा प्रकार करणाऱया वकिलांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे महापालिका आयुक्तांकडे करण्यात आली आहे. भविष्यात महापालिकेच्या कर्मचाऱयांचा अशा प्रकारे अवमान करण्याचा प्रयत्न झाल्यास तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. निवेदन देताना महापालिकेचे महसूल निरीक्षक व वॉर्ड क्लार्क उपस्थित होते.
खाते बदलाची प्रक्रिया मुख्य कार्यालयातच पूर्ण करावी
खाते बदल करण्यासाठी अर्ज दाखल केल्यानंतर मुख्य कार्यालयातून मंजुरी मिळणे आवश्यक आहे. यापूर्वी खाते बदलण्याची प्रक्रिया मुख्य कार्यालयातूनच करण्यात येत होती. पण नागरिकांच्या सोयीसाठी विभागीय कार्यालयात काम सुपूर्द करण्यात आले आहे. तरी देखील मुख्य कार्यालयातून वरि÷ अधिकाऱयांकडून मंजुरी घेणे बंधनकारक आहे. मात्र मुख्य कार्यालयातून वरि÷ अधिकाऱयांकडून खाते बदलाच्या फाईलना मंजुरी मिळत नाही. त्यामुळे नागरिकांची कामे होण्यास विलंब लागतो. पण अशावेळी वॉर्ड क्लार्क आणि महसूल निरीक्षकांना दोषी ठरविण्यात येते. त्यामुळे गुरुवारी झालेल्या घटनेनंतर खाते बदलाची प्रक्रिया मुख्य कार्यालयातच पूर्ण करावी, अशा मागणीचे निवेदन महसूल निरीक्षकांनी महापालिका आयुक्तांना दिले आहे.
अधिक वेळ करणाऱयांचा भर चौकात सत्कार
सध्या आम्ही केवळ कार्यालयामध्ये जाऊन छोटेखानी कार्यक्रम करून हा सत्कार केला आहे. मात्र कोणताही सरकारी कर्मचारी किंवा अधिकारी अधिक उशीर करत असेल तर त्यांचा भर चौकात सत्कार करू असा इशारा ऍड. लक्ष्मण पाटील यांनी दिला आहे. त्यामुळे यापुढे सरकारी कर्मचाऱयांनी नागरिकांची कामे तातडीने करून द्यावीत, असे आवाहनही त्यांनी केले आहे.