अपघात घडण्यापूर्वी दुरुस्ती करा
प्रतिनिधी / बेळगाव
जुन्या धारवाड रोडवरील सर्व्हिस रस्त्यावर माणिकबाग जैन बोर्डिंग ते मल्लिकार्जुननगर यांच्या मध्ये रस्त्यावरच लोखंडी सळय़ा बाहेर आल्या असून मोठा अपघात घडण्याची शक्मयता आहे. तेव्हा तातडीने याकडे महानगरपालिका आणि स्मार्ट सिटीच्या अधिकाऱयांनी लक्ष देऊन या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
जुन्या धारवाड रोडवर ओव्हरब्रिज बांधण्यात आले आहे. त्याला लागूनच हा सर्व्हिस रस्ता आहे. हा रस्ता अत्यंत खराब झाला आहे. लोखंडी सळय़ा रस्त्यातून बाहेर पडल्या आहेत. त्यामुळे वाहनांना मोठा धोका आहे. तेव्हा तातडीने याची दुरुस्ती करावी, अशी मागणी करण्यात आली. ऍड. सचिन शिवण्णावर यांनी याबाबत अनेक वेळा अधिकाऱयांना सांगितले आहे. तरीदेखील त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले असून मोठा अपघात घडण्यापूर्वी या सळय़ा काढाव्यात आणि रस्ताही करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
दरम्यान, पावसाळय़ामध्ये पाण्याचा निचराही होत नाही. त्यामुळे मल्लिकार्जुननगर आणि परिसरात अनेक घरांमध्ये पाणी शिरत आहे. तेव्हा रस्ता करून गटारीही मुख्य नाल्याला जोडणे गरजेचे आहे. त्यामुळे घरांमध्ये पाणी शिरणार नाही. तेव्हा याचाही गांभीर्याने विचार करावा, अशीही मागणी नागरिकांनी केली आहे.