मार्केट पोलिसांची कारवाई
प्रतिनिधी/ बेळगाव
जुन्या भाजीमार्केटजवळ मटका घेणाऱया एका मटकाबुकीला अटक करण्यात आली आहे. मार्केट पोलिसांनी गुरुवारी ही कारवाई केली आहे. त्याच्या जवळून 620 रुपये रोख रक्कम व मटक्मयाच्या चिठ्ठय़ा जप्त करण्यात आल्या आहेत.
आरीफ महम्मगौस शहापुरी (वय 30, रा. लक्ष्मीनगर, काकती) असे अटक करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे. मार्केटचे पोलीस उपनिरीक्षक एम. एस. वटारे व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली आहे. त्याच्यावर कर्नाटक पोलीस कायदा 78 अन्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे.