राजमाता कल्पनाराजे, खासदार श्री.छ.उदयनराजे यांच्या आशीर्वादाने शिवकार्य साधले
प्रतिनिधी/ सातारा
हर हर महादेव, जय भवानी जय शिवाजी अशा जयघोषात अनेक मोहिमा गटकोट संवर्धनाच्या सह्याद्री प्रतिष्ठानने फत्ते केल्या आहेत.छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या अनेक गडकोटासाठी हे प्रतिष्ठान राबत आहे.रविवारी सकाळी राजधानी सातारा येथे राजमाता कल्पनाराजे, खासदार श्री. छ.उदयनराजे यांच्या आशीर्वादाने सह्याद्री प्रतिष्ठानच्या दुर्ग सेवकांनी सह्याद्री प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्रमिक गोजममुंडे, शिवराज्याभिषेक उत्सव समिती राजधानी सातारचे संस्थापक व तरुण भारतचे आवृती दीपक प्रभावळकर यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली जुन्या राजवाडय़ाची स्वच्छता करण्यात आली.राजवाडा लख्ख करण्यात आला.दुपारी मावळ्यांनी किल्ले अजिंक्यतायावरील राजसदरेवर विचारमंथन करत दक्षिण दरवाजाची पाहणी केली.
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यात अनेक गडकोट उभे केले तर काही मिळवले.त्याच गडांच्या संवर्धनासाठी सह्याद्री प्रतिष्ठान अविरत कार्य करते आहे.महाराष्ट्र व बाहेर अनेक गडकोटांवर जाऊन तेथील अभ्यास करणारे सह्याद्री प्रतिष्ठानचे संस्थापक श्रमिक गोजममुंडे.सह्याद्री प्रतिष्ठानचे राज्यभर कार्य सुरू आहे.सातारा ही मराठय़ांची राजधानी.छत्रपती शाहू महाराजांनी वसवलेली नगरी. याच नगरीतील जुना राजवाडा अप्रतिम वास्तुकलेचा नमुना आहे.याच राजवाडय़ाची स्वच्छता करण्याचा मानस सह्याद्री प्रतिष्ठानचे संस्थापक श्रमिक गोजममुंडे यांनी राजमाता कल्पनाराजे यांना बोलून दाखवला.रविवारी सकाळी मोहिमेला सुरुवात करण्यात आली.ही मोहिम राजमाता कल्पनाराजे, खासदार श्री.छ.उदयनराजे यांच्या आशीर्वादाने सह्याद्री प्रतिष्ठानचे संस्थापक श्रमिक गोजममुंडे, शिवराज्याभिषेक उत्सव समितीचे संस्थापक व तरुण भारतचे आवृत्ती प्रमुख दीपक प्रभावळकर यांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला.या मोहिमेत प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष सागर माने, निलेश झोरे, बाळकृष्ण यांच्यासह दुर्गसेवक सहभागी झाले होते.मोहीम फत्ते केल्यानंतर दुपारी किल्ले अजिंक्यतारा येथील राज्यसदरेवर सर्व मावळे गेले.तेथे विचारमंथन केले.श्रमिक गोजममुंडे यांनी सर्व उपस्थिताना किल्ले अजिंक्यतायाची महती सांगितली. दक्षिण दरवाजाची पाहणी करण्यात आली.