रस्ते वाहतूक मंत्रालयाकडून परिपत्रक सादर – वेळेत नोंदणी न केल्यास होणार दंड आकारणी
नवी दिल्ली
आता जर वाहनधारकांजवळ 15 वर्ष जुने वाहन असल्यास त्यांची पुन्हा नेंदणी करणे महागणार आहे. वर्ष एप्रिल 2022 च्या आर्थिक वर्षामध्ये जर पुर्ननोंदणी करण्यासाठी आजच्या शुल्कापेक्षा तब्बल आठ पट अधिकची रक्कम वाहनधारकांना देणे बंधनकारक राहणार आहे.
यासोबतच ट्रक आणि बसचे फिटनेस सर्टिफिकेट रिन्यू करण्यासाठी आगामी वर्षापासून (2022) जवळपास आठ पट अधिकचे शुल्क द्यावे लागणार आहे. यासाठी रस्ते, परिवहन आणि राजमार्ग मंत्रालयाकडून सोमवारी या संदर्भात नवीन व्यवस्था लागू करण्यासाठी परिपत्रक सादर केले होते.
वाहन प्रकारानुसार शुल्क
सरकारने सादर केलेल्या परिपत्रकानुसार 15 वर्षे जुन्या वाहनांमध्ये कार, दुचाकी, अवजड वाहनं यासह अन्य वाहनांसाठी शुल्क आकारणी होणार आहे.