नवी दिल्ली
जूनच्या तुलनेमध्ये जुलै 2021 मध्ये नोकर भरतीमध्ये 4 टक्के इतकी वाढ मेट्रो शहरांमध्ये नोंदली गेली आहे. मॉन्स्टर डॉट कॉम यांनी यासंबंधीची माहिती दिली आहे. जुलैमध्ये सर्व प्रकारामध्ये उमेदवारांची भरती करण्यात आल्याचे दिसून आले आहे. वर्षाच्या आधारावर पाहता जुलैमध्ये भरतीप्रमाणात 8 टक्के इतकी सकारात्मक प्रगती दिसली आहे. येणाऱया काळातही भरतीत वाढ होणार असल्याचे संकेत कंपनीने व्यक्त केले आहेत.