फिलिपाईन्सच्या बेटावरील अजब दृश्य
जुळी लोकं नेहमीच आकर्षणाचे केंद्र ठरत असतात, जेव्हा ती गर्दीतून वाट काढतात, तेव्हा लोक त्यांना मागे वळून अवश्य बघतात, कारण जुळय़ा लोकांना पाहण्याचा योग फारच कमीवेळा येत असतो. पण फिलिपाईन्समधील एका बेटावर जुळय़ा लोकांची संख्या अत्यंत अधिक आहे. मजेशीर बाब म्हणजे येथील प्रत्येक तिसऱया घरात जुळी भावंडं राहतात.
फिलिपाईन्सच्या बेटावर वसलेले अलबाट गाव मासेमारीसाठी ओळखले जाते. तसेच ते स्वतःच्या नैसर्गिक सौंदर्यासाठी देखील प्रसिद्ध आहे. पण आणखीन एक गोष्ट या बेटाला विशेष स्वरुप प्राप्त करून देते आणि ती आहे येथील जुळी लोकसंख्या. गावात अनेक जुळी भावंडं आहेत. जर तुम्ही या बेटावर पोहोचला तर तुम्हाला एकसारखी लोक दिसून नक्कीच चकित व्हायला होईल.
अलबाटमध्ये 15 हजार लोकांचे वास्तव्य असून यात सुमारे 100 जुळी भावंडं आहेत. या गावात इतक्या अधिक प्रमाणात जुळी मुलं का जन्माला येतात याचे कारण कुणालाच माहित नाही. येथी 4 महिन्यांच्या मुलांपासून 86 वर्षांपर्यंतची जुळी भावंडं दिसून येतात.
येथील लोक देखील एकसारखेच कपडे परिधान करत असल्याने जुळय़ा मुलांमध्ये ओळख पटविणे देखील अवघड असते. एका अहवालानुसार येथील महिलांना प्रजननशक्ती वाढविण्यासाठी विशेष औषधांचे सेवन केले होते, ज्यानंतर 1996 ते 2006 पर्यंत 35 वर्षांच्या महिलांमध्ये मल्टीपल प्रेग्नंसीमध्ये 182 टक्क्यांची वाढ झाली होती. पण येथे इतकी जुळी मुलं का जन्माला येतात हे शोधून काढण्यासाठी कुठल्याही प्रकारचे वैज्ञानिक संशोधन करण्यात आलेले नाही.