मेहसाणा :
गुजरातच्या वडनगर येथील कोरोनाबाधित महिलेने जुळय़ांना जन्म दिला आहे. यातील एक नवजात कोरोना पॉझिटिव्ह तर दुसरा नवजात निगेटिव्ह आढळला आहे. संसर्गाच्या अशाप्रकारच्या प्रकरणामुळे डॉक्टरही हैराण झाले आहेत. कोरोनाबाधित हसुमती बेन परमार या महिलेने शनिवारी जुळय़ा मुलांना जन्म दिला. माता बाधित असल्याने दोन्ही नवजातांचे नमुने चाचणीसाठी पाठविण्यात आले. त्यांचा अहवाल प्राप्त झाल्यावर डॉक्टर चकीतच झाले. जुळय़ांपैकी मुलाचा अहवाल पॉझिटिव्ह तर मुलीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. डॉक्टरांनी नवजातांचे नमुने पुन्हा चाचणीसाठी पाठविले आहेत.